बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी त्यांना वाघ म्हणणार नाही, संत म्हणतो… संत संजय राठोड लगे रहो!”

सिंधुदुर्ग | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव भाजपचे अनेक नेते वारंवार घेत आहेत. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप सर्वप्रथम भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला होता. त्यानंतर संजय राठोड तब्बल 15 दिवसांनी समोर आले. आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असं म्हणत भाजप आमचे कुटुंब उद्ध्वस्त करायला निघालं असल्याचा आरोप राठोडांनी केला आहे. याला भाजप नेते नारायण राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राठोड पोहरादेवी इथं दर्शनाला गेले असता त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली. यावेळी समर्थकांनी “कोण आला रे कोण आला बंजाऱ्याचा वाघ आला”, अशा घोषणा देत शक्तिप्रदर्शन केलं. याविषयी बोलताना बलात्काराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही वाघ म्हणता? ही कमालीची गोष्ट आहे. मी त्यांना संत म्हणतो, संत संजय राठोड लगे रहो असं म्हणत राणेंनी आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

महाविकास आघाडी सरकार फक्त शरद पवारांच्या कृपादृष्टीमुळे उभं राहिलं आहे, नाहीतर उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला नसता. या राज्यातील कोणताही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त हुशार आणि कायद्याचं ज्ञान असणारा आहे, अशी बोचरी टीका राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

मीडियाने एवढी मेहनत करुन या प्रकरणातील ऑडिओ क्लिप्स बाहेर काढल्या, त्या क्लिप्स मध्ये आवाज कोणाचा आहे?, तिला डॉक्टरकडे घेऊन जा, तिचा मोबाईल घे, अशा सूचना फोनवरून कोण देत आहे? याची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकार का देत नाही? असे सवालही राणे यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मी ठरवेन तेच धोरण आणि मी लावेन तेच तोरण, या अहंकारात मंत्रिमंडळ”

‘टाईमपास’मधील प्राजूचा ग्लॅमरस अंदाज! पहा फोटो…

“मुख्यमंत्री बलात्काऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसलेत, संजय राठोडला तर चपलेनं झोडलं पाहिजे”

माझ्या आईवर कॅन्सर ट्रिटमेंट चालू आहे, तिच्यासाठी प्रार्थना करा- राखी सावंत

‘विद्यार्थ्यांनो तुमचं हे बागडण्याचं, खेळण्याचं वय आहे, पण…’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची विद्यार्थ्यांना भावनिक साद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More