बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इथं माणसं मरत आहेत, तुम्ही मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?”

मुंबई | ठाकरे सरकारने लागू केलेल्या संचारबंदीवर भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीकास्त्र सोडलं आहे. संचारबंदीच्या निर्णयाने राज्यातील जनता समाधान होणार आहे का? त्यामुळे त्यांचं पालनपोषण होणार आहे का? दीड हजारात लोकांचं पोट कसं भरणार?, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.

राज्यातील कामगार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील कोरोना बळींची वाढती संख्या हे उद्धव ठाकरे सरकारचं पाप आणि अपयश आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

राज्य आहे, राज्याला स्वत:साठी लागणारा पैसा निर्माण करण्याचा अधिकार घटनेने दिलाय. त्यामुळे जरा संविधान वाचा. मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय राहता?. इथं माणसं मरत आहेत. 60 हजार लोकं मेली आहेत. राज्य दिवाळखोरीकडे जात आहे. दीड हजार रुपये जाहीर करण्याचं काम क्लार्कचं आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय देता?, असा सवाल नारायण राणे यांनी केलाय.

दरम्यान, नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रडत लक्ष्मी आहेत. तर अनिल परब हे सेवाभावी आहेत, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘पुढचे चार आठवडे अतिशय महत्त्वाचे’; कोरोनाच्या प्रसाराबाबत तज्ज्ञांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

‘ताईसाहेब, राजकारण इतरत्र जरूर करा, पण…’; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर

“अजित पवार सर्जन आहेत”; पहाटेच्या शपथविधीवर संजय राऊतांचे पुन्हा भाष्य

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी मुकेश अंबानी आले धावून; उचललं हे मोठं पाऊल!

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये काँग्रेसचा आमदार असेल- नाना पटोले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More