बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणेंची सुरक्षा वाढवली; अटकेच्या कारवाईनंतर मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सुरक्षेत मोठे बदल करण्यात आले आहेत. नारायण राणे यांना यापूर्वी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. पण अशात घडलेल्या काही राजकीय घटना बघता नारायण राणेंच्या सुरक्षेत (Security) वाढ करण्यात आली आहे.

नारायण राणेंच्या सुरक्षेसाठी आता दोन ऐवजी आठ सीआयएसएफ (CISF) जवान असणार आहेत. नारायण राणे यांना केंद्र सरकारकडून झेड दर्जाची सुरक्षा (Z Security) देण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या सुरक्षेचा आढावा घेत केंद्र सरकारने (Central Goverment) हा निर्णय घेतला आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अमृत महोत्सवाऐवजी हिरक महोत्सव असा उल्लेख केला होता. या प्रकारावरून नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकारण चांगलच तापलं होत. या घटनेनंतर राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांवरील वादग्रस्त विधानानंतर ठाकरे सरकारने राणेंविरोधात अटकेची कारवाई केली. या अटकेनंतर केंद्र सरकारने नारायण राणे यांच्या सुरक्षेचा आढावा घेत त्याबाबतचा अहवाल मागितला होता. त्यानूसार केंद्राने नारायण राणे यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

गजराज भडकले अन् पर्यटकांची उडाली तारांबळ! पुढे काय झालं बघाच; पाहा व्हिडीओ

‘बाबा नको जाऊ दूर…’,वडिलांच्या निधनानंतर सायली संजीवची भावूक पोस्ट

बच्चू कडू वादाच्या भोवऱ्यात! वंचितकडून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

“साहेब भिजतील म्हणून पाऊस पडला, पण पावसाला काय माहिती साहेब फक्त…”

पाकिस्तानची जगभर नाचक्की! ट्विट करत खुद्द अधिकाऱ्यांनीच केली पोलखोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More