बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”

मुंबई | भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळवलेले नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवसेनेवर नेहमी टीका करत असताना पाहायला मिळत असतात. तसेच नुकतंच त्यांनी कोकणातील पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्यव्य केलं होतं.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या त्या वादग्रस्त वक्तव्याचा माध्यमांशी बोलत असताना चांगलाच समाचार घेतला आहे. आज पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेबद्दल बोलत असताना म्हटलं की, “नारायण राणे कुठंही गेले तरी त्यांची ओळख कायम शिवसैनिक म्हणुनच राहील”

दरम्यान, संसदेत अनेक खासदार येतात पण शिवसेनेच्या खासदारांची वेगळी ओळख असल्याचं म्हणत शिवसेना सोडुन गेलेल्या खासदारालाही शिवसैनिक म्हणुनच लोक ओळखतात, नारायण राणे आमका असं न म्हणता, तो शिवसैनिक आहे, असं म्हटलं जातं, असं राऊतांनी नारायण राणेंना टोला लगावत म्हटलं आहे.

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टीका करत असताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता मुख्यमंत्र्यांवर राणेंनी टीका केल्यानंतर संजय राऊतांनी त्यांना लगावलेल्या टोल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यावर राणे आपल्या खास शैलीत काही प्रतिक्रीया देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

दादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार

सावधान! देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी

“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”

श्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो!

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More