महाराष्ट्र मुंबई

नारायण राणे भाजप खासदारकीचा राजीनामा देणार??? उचलणार मोठं पाऊल

मुंबई | राज्यसभा खासदार नारायण राणे आपल्या भाजप खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. याबाबत ते लवकरच घोषणा करणार असल्याचीही माहिती आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचीही माहिती आहे. राणेंचा पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीला बाहेरून पाठिंबा देण्याचीही शक्यता आहे.

भाजप- सेनेची युती झाल्यापासून राणे भाजपपासून काहीसे दूर झाले होते. मुख्यमंत्र्यांनीही राणेंना ‘साईड ट्रॅक’ केल्याची भावना राणेंच्या गोटात आहे. त्यामुळेच नारायण राणे नाराज असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी काल(रविवार) नारायण राणेंची भेट घेतली होती.  राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मलायका म्हणते… ‘कबूल किया मैंने उसको और उसके प्यार को!’

फारूख अब्दुल्ला म्हणतात, आम्ही भारतीयच पण…

-गिरीश महाजन देशातील मोठे नेते आहेत- संजय राऊत

-काँग्रेसला मोठा धक्का… ‘या’ नेत्याने दिला राजीनामा; करणार भाजपत प्रवेश

मनसेची ‘ही’ भूमिका आग्रही; पण आम्हाला मान्य नाही- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या