भाजप शिवसेनेला भीक घालणार नाही? नितेश राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!

मुंबई | ंमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेतल्यास कठोर परिणामांना तयार राहण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय. मात्र भाजप या इशाऱ्याला भीक घालणार नसल्याचं दिसतंय.

फडणवीस सरकारला 3 वर्षे पूर्ण होतायत त्यानिमित्ताने नव्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. या नावांमध्ये नारायण राणेंचंही नाव असल्याचं कळतंय.

काँग्रेस नेते नितेश राणे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गेले होते. दरम्यान, शिवसेना याप्रकरणी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.