येत्या काही दिवसांतच मंत्रिमंडळात प्रवेश, नारायण राणेंचा दावा

मुंबई | काही दिवसांतच मंत्रिपदाची शपथ घेईन असा दावा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केलाय. झी 24 तास वृत्त वाहिनीशी बोलताना राणे यांनी हा दावा केला.

गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशावरून भाजप आणि शिवसेनेत खडाजंगी सुरूय. मंत्रिमंडळात प्रवेश केला तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, शिवसेना एक नंबरचा घाबरट पक्ष असल्याची टीकाही राणे यांनी केली.

नोटाबंदीवरून सुरू असलेल्या आंदोलनावरही त्यांनी टीका केलीय. काँग्रेसमध्ये आक्रमकता उरलेली नाही, असंही ते म्हणाले.