सत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे

सिंधूदुर्ग | सत्तेशिवाय मातोश्रीची चुल पेटणार नाही. त्यामुळे सत्ता सोडण्याच्या गप्पा करणारे सत्ता कधीच सोडणार नाहीत, अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी शिवसेनेवर केली आहे. 

वैभववाडी येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. सत्ता हाच शिवसेनेचा प्राणवायु आहे, असं म्हणत नारायण राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. 

39 वर्षे जिवाची पर्वा न करता बाळासाहेबांवरील निष्ठेमुळे शिवसेनेत झगडलो. शिवसेना मराठी माणसांचा पक्ष असल्याचं भासवण्यात आले. मात्र त्यांनी मराठी युवक-युवतींसाठी काय केलं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, आताच्या शिवसेनेत धंदेवाईक राजकारण सुरु आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि खासदार कुचकामी ठरले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार

– पुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू!

-पुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत!

-स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन

-…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं!