Top News राजकारण

“पिंजऱ्यात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना सर्टिफिकेट कसं देणार?”

मुंबई | भाजप आणि शिवसेना यांच्यातील नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक यु्द्ध सुरु आहे. त्यातच भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याच परीक्षेला बसले नाहीत. ते फक्त पिंजऱ्यात बसून आहेत. शिवाय त्यांनी काहीच कामं केली नाहीत. मग सर्टिफिकेट कसं देणार?, असा सणसणीत टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही असं म्हणाले होते. यावरूनच नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय.

नारायण राणे पुढे म्हणाले, “सध्या राज्यात तीन पक्षाचं सरकार असून हे तिन्ही पक्ष हिंदूविरोधी आहेत असं म्हणणार नाही. पण शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही. शिवसेनेला मी हिंदुत्ववादी म्हणणार नाही.”

महत्वाच्या बातम्या-

भाजप नेते राम कदम यांना मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

काँग्रेस अध्यक्षपदासाठी डिसेंबरमध्ये होणार निवडणूक प्रक्रिया

पुढच्या लिलावात चेन्नईने महेंद्रसिंग धोनीला सोडून द्यावं; माजी खेळाडूचं मत

“महाराष्ट्र पोलिसांची माफी मागा अन्यथा तुमचे सर्व धंदे बाहेर काढू”

शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द नाही तर…- एकनाथ खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या