तोंड बंद ठेवा, अन्यथा मातोश्रीवरील सगळी गुपितं बाहेर काढेन!

सांगली | उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधातील कारस्थानं थांबवावीत, नाहीतर अन्यथा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना कसा त्रास दिला ते मी उघड करेन, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी दिलाय. ते सांगलीत बोलत होते.

उद्धव यांनी माझ्यावर आरोप करू नयेत. त्यांनी आपलं तोंड बंद ठेवावं नाहीतर मातोश्रीवरील सगळ्या घटना आणि गुपितं बाहेर काढावी लागतील, असंही ते म्हणाले.

दरम्यान, राणे मंत्री होऊ नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांवर शिवसेनेकडून दबाव टाकला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.