बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वरुण सरदेसाई… आता आलास तर तू परत जाणार नाहीस”

रत्नागिरी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक झाली होती, त्यानंतर त्यांची सुटकाही झाली. आता ते जनसंवाद यात्रेत परतले असून त्यांनी शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच भाषणात त्यांनी शिवसेनेसह ठाकरे कुटुंबावर जोरदार टीका केली. याशिवाय राणेंच्या घरासमोर राडा करणारे युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनी देखील त्यांनी दम भरला आहे.

माझा एकदा घसा ठिक होऊ द्या, एकेकाला सोडणार नाही. माझा आवाज पूर्वीसारखा झाल्यावर मी खणखणीत वाजवणार, मी 40 वर्षे सोबत होतो. माझ्याकडे मोठा मसाला आहे. शिवसेना औषधाला सुद्धा सापडणार नाही, असा थेट इशारा त्यांनी शिवसेनाला दिला आहे. यासोबत त्यांनी वरुण सरदेसाई यांचा देखील आपल्या भाषणात उल्लेख करत त्यांनाही इशारा दिला आहे.

तो वरुण सरदेसाई आमच्या घरावर हल्ला करतो काय, आता आलास तर परत जाणार नाही. आमच्या घरावर हल्ला करणारांना सोडणार नाही, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. नितेश राणे यांनी आव्हान दिल्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी राणेंचं घर गाठलं होतं, या गटाचं नेतृत्त्व वरुण सरदेसाई यांनी केलं होतं. यावेळी राणेंच्या घराबाहेर जोरदार राडा झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सरदेसाई यांच्यासह राणेंच्या घरापुढे राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटीला बोलवून त्यांचं कौतुक देखील केलं होतं.

दरम्यान, याच भाषणात बोलताना राणेंनी काही धक्कादायक गौप्यस्फोट देखील केले. मोरेंची हत्या कशी झाली? त्याचं कारणही आम्हाला माहीत आहे. आपल्याच बंधूच्या पत्नीवर अॅसीड फेकायला कुणी सांगितले हेही आम्हाला माहीत आहे. सुशांत सिंग आणि दिशा सालियनची केस अद्याप संपलेली नाही, मी केंद्रात मंत्री आहे हे लक्षात ठेवा. टप्प्या-टप्प्यानं सगळं बाहेर काढणार, असा इशारा नारायण राणेंनी शिवसेनेला दिला.

थोडक्यात बातम्या-

वादानंतर पहिल्याच भाषणात राणेंचा उडवून दिली खळबळ, “आपल्याच बंधूच्या पत्नीवर…”

“तुम्हाला सुट्टी नाही, लवकरच हिशोब चुकता करणार”; जो बायडन संतापले!

अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेतील पोलिसाची बदली, संपत्ती ऐकाल तर डोळेच फिरतील!

पोलिसांनी कपडे फाटेस्तोवर मारलं, आता आदित्य ठाकरेंकडून मिळालं मोठं बक्षीस!

एकनाथ खडसेंना सर्वात मोठा धक्का, एवढ्या कोटी रुपयांची संपत्ती जप्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More