“त्याच्यातला कलावंत उमगला”, नितेश राणेंच्या ‘म्याँव-म्याँव’वर नारायण राणेंची प्रतिक्रिया
मुंबई | बीएमसीने नोटीस बजावल्यानंतर भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. नारायण राणे यांनी शिवसेना व शिवसेना प्रमुखांवर थेट निशाणा साधला तर भाजप नेते व आमदार नितेश राणे यांचं तोंडभरून कौतुक केलं.
नितेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान पायऱ्यावर आंदोलन करताना म्याँव-म्याँव आवाज काढत आदित्य ठाकरेंना डिवचलं होतं. यावर बोलताना नितेश एक कलाकार बनतोय याचं समाधान असल्याचं नारायण राणे म्हणाले.
मांजरीचा आवाज काढलाय त्यानं, त्याच्यातला कलावंत उमगला. नितेश एक कलाकार बनतोय याचं समाधान आहे, असं म्हणत नारायण राणे यांनी नितेश राणेंचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, नितेशवर एक कारवाई म्याँव-म्याँवची आहे. म्याँव-म्याँव कोण आहे हे माहित नाही. वाघ जाऊन मांजर कशी आली हे मला कळालं नाही. स्वत:ला वाघ म्हणणारे मांजरीच्या आवाजनं का असे झाले समजलं नाही, असा टोलाही राणेंनी लगावला.
थोडक्यात बातम्या-
‘दिशा सालियनवर बलात्कार झाला तेव्हा फ्लॅटबाहेर मंत्र्याचे…’, राणेंचा खळबळजनक दावा
“जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहे तोपर्यंत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही”
“…पण आज शिवसेनेचे पक्षप्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर उठलेत”
कोरोना संसर्ग जास्त काळ राहिल्यास ‘या’ गोष्टीवर होऊ शकतो गंभीर परिणाम
‘तू कोणाची सुपारी घेऊन आलाय का?’, भर भाषणात अजित पवार संतापले
Comments are closed.