Top News महाराष्ट्र रत्नागिरी

…तर जयंत पाटील भाजपमध्ये असते- नारायण राणे

रत्नागिरी | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दोन दिवसांपुर्वी भाजप नेते आणि खासदार नारायण राणेंवर खोचक अशी टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना नारायण राणेंनी एक दावा केला आहे.

महाविकास आाघाडी सरकार जर स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते. त्यावेळी पाटलांचं भाजपमधील वरिष्ठ नेत्यांसोबत यासंदर्भात बोलणं झालं असल्याचं  नारायण राणेंनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारावेळी बोलताना पाटलांनी नारायण राणेंवर टीका केली होती. राणे सारखेच महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात यावर बोलताना, गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं, असं पाटलांनी म्हटलं होतं.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचं म्हणत भाजप लोकांच्या मनात संभ्रम करत आहे. मात्र सरकारला आता एक वर्ष पुर्ण झालं आहे. त्यामुळे राणेंच्या टीकेला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं पाटील म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये काय चर्चा रंगली?; राऊतांची महत्त्वाची पोस्ट

शेतकऱ्यांना सन्मानानं दिल्लीत येऊ द्या, नाहीतर… बच्चू कडूंचा मोदींना इशारा

कंगणा राणावत पुन्हा अडकली नव्या वादात; ट्रोल होताच काढला पळ!

“तुमच्या मेव्हण्याची जिरवली, आता तुमचीपण जिरवू”

एकनाथ खडसे मोठा गौप्यस्फोट करणार; संध्याकाळी ‘या’ विषयावर पत्रकार परिषद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या