बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा आभारी”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातील नव्या भाजप नेत्यांचा समावेश झाला आहे. यामध्ये आधीच्या काही मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे. तर भाजप नेते नारायण राणे यांच्यासह चार जणांचा समावेश झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यावर राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. त्यांच्यामुळेच मी आज केंद्रीय मंत्री बनलो आहे. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात माझ्यावर जी जबाबदारी देण्यात येईल ती योग्यरित्या सांभाळेल, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

इतक्या वर्षाचा प्रवास दोन वाक्यात सांगणं शक्य नाही. पण आज सांगताना आनंद होतोय की, पहिल्यांदा मुंबई महापालिकेत नगरसेवक झालो. त्यानंतर आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आणि आता केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, असंही नारायण राणे म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवरही भाष्य केलं आहे.

दरम्यान, 1999 ला मुख्यमंत्री झालो. त्यानंतर अनेक चढउतार आले. आता मोदींच्या नेतृत्वात हे पद मिळालं आहे. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावणार असल्याचं राणेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक! पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा आजची आकडेवारी!

सहकार क्षेत्रासाठी मोदी सरकारचं मोठं क्रांतिकारी पाऊल; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबईतील कोरोना रूग्णसंख्या वाढली; वाचा आजची आकडेवारी एका क्लिकवर

मंत्रिमंडळ विस्तारावर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“शिवसेनेला आम्ही किंमत देत नाही, जे मिळालं त्यात समाधानी”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More