बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वादानंतर पहिल्याच भाषणात राणेंचा उडवून दिली खळबळ, “आपल्याच बंधूच्या पत्नीवर…”

रत्नागिरी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक झाली होती. जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेला शिंगावर घेणं सोडलेलं नाही, हे नारायण राणे यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केलं आहे. वादानंतरच्या पहिल्याच जाहीर भाषणात त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला टार्गेट केलं असून अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत.

दरोडेखोरांना अटक करतात तशी एका केंद्रीय मंत्र्याला तुम्ही अटक केलीत. 200 पोलिसांना फौजफाटा, काय पराक्रम केलाय तुम्ही???, माझा एकदा घसा ठिक होऊ द्या, मी सोडणार नाही. माझा आवाज पूर्वीसारखा झाल्यावर मी खणखणीत वाजवणार, असं म्हणत नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला ललकारलं आहे.

मोरेंची हत्या कशी झाली? त्याचं कारणही आम्हाला माहीत आहे. आपल्याच बंधूच्या पत्नीवर अॅसीड फेकायला कुणी सांगितले हेही आम्हाला माहीत आहे. सुशांत सिंग आणि दिशा सालियनची केस अद्याप संपलेली नाही, मी केंद्रात मंत्री आहे हे लक्षात ठेवा. टप्प्या-टप्प्यानं सगळं बाहेर काढणार, असा इशारा नारायण राणेंनी शिवसेनेला दिला आहे.

मला धमक्या देऊ नका, मी 40 वर्षे सोबत होतो. माझ्याकडे मोठा मसाला आहे. शिवसेना औषधाला सुद्धा सापडणार नाही. तो वरुण सरदेसाई आमच्या घरावर हल्ला करतो काय, आता आला तर परत जाणार नाही. आमच्या घरावर हल्ला करणारांना सोडणार नाही, असंही नारायण राणे यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“तुम्हाला सुट्टी नाही, लवकरच हिशोब चुकता करणार”; जो बायडन संतापले!

अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेतील पोलिसाची बदली, संपत्ती ऐकाल तर डोळेच फिरतील!

पोलिसांनी कपडे फाटेस्तोवर मारलं, आता आदित्य ठाकरेंकडून मिळालं मोठं बक्षीस!

एकनाथ खडसेंना सर्वात मोठा धक्का, एवढ्या कोटी रुपयांची संपत्ती जप्त

“भाजप फुटीच्या उंबरठ्यावर, ‘हे’ नेते माझ्या संपर्कात”; काँग्रेस नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More