बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे’; नारायण राणेंच्या आरोपाने खळबळ

मुंबई | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यावरून ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच विरोधकांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशात भाजप खासदार नारायण राणे यांनी सरकारवर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केले आहेत.

परमबीर सिंह यांचे आरोप खोटे असल्याचं देशमुख आता सांगत आहेत. मग इतके दिवस ते काय करत होते? आयुक्त पदावर असताना परमबीर काय करत होते याची कल्पना देशमुख यांना नव्हती का?, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे. तसेच वाझे गृहमंत्री देशमुख यांच्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांना माहिती द्यायचे. त्यांना खंडणी वसुली करण्याची परवानगी ठाकरेंनीच दिली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार उरलेला नाही, असा घणाघात नारायण राणेंनी केला आहे.

सचिन वाझेंनी कोणासाठी एन्काऊंटर केले याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे. वाझे वर्षावर वास्तव्यास होते, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार केवळ कमवायला सत्तेत आलं आहे, असा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा. त्यांना एक दिवसदेखील सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘केंद्राने या प्रकरणाचा तपास केल्यास राज्यात फटाक्याची माळ लागेल’; राज ठाकरे कडाडले

परमबीरसिंग यांचा धक्कादायक खुलासा; मेल आयडीबद्दल म्हणाले…

राज्यात सत्ताबदल होणार?; उदयनराजेंना ‘या’ शिवसेना नेत्यानं वापरलेल्या वाक्यानं चर्चांना उधाण

एका पोलीस अधिकाऱ्याला 100 कोटीचं लक्ष्य मग अख्ख्या राज्य सरकारसमोरील लक्ष्य किती असेल- पूनम महाजन

“फडणवीसांच्या मोदी-शहा भेटीनंतर सिंह यांनी पत्र दिलं म्हणूनच संशय येतोय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More