महाराष्ट्र मुंबई

या लोकांना महिलांवर अत्याचार करायला सरकारने लायसन्स दिलंय काय?- नारायण राणे

Photo Credit- Facebook/ Narayan Rane & Uddhav Thackeray

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

ठाकरे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ, ताकद देत आहे. इथं कुंपणच शेत खात आहे. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियान आणि आता पूजा चव्हाण प्रकरणात तेच होत आहे. एखात्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर आहे, अशी टीका नारायण राणे यांनी सरकारवर केली आहे.

सरकारमधील अनेक मंत्र्यांवर बलात्कार, हत्या सारखे गंभीर आरोप झाले. पण ठाकरे सरकारकडून सगळ्यांना अभय देण्याचं काम सुरु असल्याची टीका देखील नारायण राणेंनी केली आहे. त्याचबरोबर या लोकांना अत्याचार करायला लायसन्स दिलंय काय?, असा सवालही राणेंनी सरकारला विचारला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त होतं. पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. त्यावरुन राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…पण भाड्याचं घर शेवटी भाड्याचं असतं’; कंगणा राणावतचा ट्विटरला टोला ‌

‘भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला माहित’; विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

जेव्हा नाचायला लागली शालू… सोशल मीडियावर पोरं झाली चालू, पाहा व्हिडीओ

सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी

‘या’ बॅंकांमध्ये तुमची खाती तर नाहीत ना?; ‘या’ चार बँकेचं होतयं खाजगीकरण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या