“अनिल देशमुख यांच्याआधी उद्धव ठाकरेंचा राजीनामा घ्या, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही”
मुंबई | परमबीर सिंह यांचे आरोप खोटे असल्याचं देशमुख आता सांगत आहेत. मग इतके दिवस ते काय करत होते? आयुक्त पदावर असताना परमबीर काय करत होते याची कल्पना देशमुख यांना नव्हती का?, असा सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी अनिल देशमुखांना केला आहे.
परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यावरून ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच विरोधकांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नारायण राणेंनी देखील या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
वाझे गृहमंत्री देशमुख यांच्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांना माहिती द्यायचे. त्यांना खंडणी वसुली करण्याची परवानगी ठाकरेंनीच दिली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार उरलेला नाही, असा घणाघात नारायण राणेंनी केला आहे. तसेच अनिल देशमुख यांच्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा. त्यांना एक दिवसदेखील सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असं नारायण राणे म्हणालेत.
सचिन वाझेंनी कोणासाठी एन्काऊंटर केले याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे. वाझे वर्षावर वास्तव्यास होते, असा खळबळजनक दावाही नारायण राणे यांनी केला आहे. तसेच व्यवसायिक मनसुख हिरेन यांची दिवसाढवळ्या हत्या करतो आणि असा अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा असतो. मुख्यमंत्री त्याची पाठराखण करतात. तो मुख्यमंत्र्यांना अगदी संत सज्जन वाटतो, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“महाराष्ट्रात गृहविभाग नेमकं कोण चालवतंय; अनिल परब की अनिल देशमुख?”
“ठाकरे सरकार चोरांचं, खुन्यांचं असून ते बरखास्त करण्यात यावं”
“वाझेला कामावर रुजू करून घेताना सरकार काय झोपलं होतं का?”
“…त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राजीनामा दिला होता का?”
गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.