मुंबई | आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाची आब राखली. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवण्याच्या लायकीचे नाहीत, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला नारायण राणे पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय. माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या भाषणाने शैलीने विचाराने आणि कामाने आपली आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. त्याला आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपवाद आहेत, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय.
उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता, शिवराळ भाषेत ते बरळले. राज्यात केलेल्या कोणत्याही कामाचा त्यांनी कालच्या भाषणात उल्लेख नाही, असं सांगत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीये.
हिंदुत्वावर बोलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही, युती करुन 56 आमदार निवडून आले ते नरेंद्र मोदींच्या नावावर, नाहीतर 25 आमदारही आले नसते, सेक्युलर पक्षाशी हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्रिपद मिळवलं, असं नारायण राणेंनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
…तर आमचाही तोल जाईल आणि मातोश्रीच्या आतल्या गोष्टी बाहेर काढेन- नारायण राणे
रामदास आठवलेंच्या उपस्थितीत अभिनेत्री पायल घोषचा ‘आरपीआय’मध्ये प्रवेश!
“मुख्यमंत्री सावरकरांबद्दल एकही शब्द का बोलले नाहीत? त्यांना नव्या मित्रांची भीती वाटत असावी”
मी तुमचं काय अभिनंदन करू मला अभिनंदन करायचीही लाज वाटत आहे- नितीन गडकरी