Top News

“तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही”

मुंबई | आम्ही तुमच्या मागे लागलो तर तुमच्यासाठी अवघड परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला होता. यारवरून भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मोदी साहेबांना आणि अमित शाहांना धमक्या देऊ नका, आम्ही येथे समर्थ आहोत. तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केलीये.

आम्हाला नका सांगू हात धुवून मागे लागू. कोण कोणाच्या मागे लागेल हे लवकरच कळेल. माझ्याकडे शंभर टक्के कुंडल्या आहेत. त्यामुळे मातोश्रीच्या आतल्या आणि बाहेरच्या अशा सर्वांची पळता भुई थोडी होईल. आम्ही मागे लागलो तर तुम्हाला झोप येऊ देणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

महाविकास आघआडीतील तिन्ही पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस तर केवळ मंत्रिपदांसाठी शिवसेनेसोबत गेली, अशी टीका नारायण राणे यांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या-

“गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं”

राष्ट्रवादीकडून ‘त्या’ नेत्याची हकालपट्टी अन् शिवसेनेला मोठा दिलासा!

पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण पराभव; धवन-पंड्याची खेळी व्यर्थ

भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत आहेत, चंद्रकांत पाटील हे तर बावचळलेत- अजित पवार

“विरोधी पक्षाकडून महाराष्ट्राची प्रगती रोखण्याचा प्रयत्न”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या