Loading...

“भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल तर शिवसेनेला 55 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत”

मुंबई |  सोमवारी महाराष्ट्रात विधानसभेसाठीचं मतदान पार पडलं. त्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत. या एक्झिट पोलवर खासदार नारायण राणे यांनी भाष्य केलं आहे.  भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल तर शिवसेनेला 55 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

एक्झिट पोलच्या निष्कर्षाशी मी सहमत नाही. भाजपचा कमीत कमी 135 ते 150 जागांवर विजय होईल, असा अंदाज नारायण राणेंनी लावला आहे. साहजिकच भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल तर शिवसेना 50 ते 55 च्या वर जाणार नाही, असं राणेंनी सांगितलंय.

Loading...

नितेश राणे कणकवली मतदारसंघातून 50 हजारांच्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला आहे. तसंच उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर मी आता बोलणार नाही, असंही राणे म्हणाले आहेत.

कोकणातल्या शिवसेना उमेदवाराला कोणी ओळखतं का तरी? असं म्हणत त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...