महाराष्ट्र सिंधुदुर्ग

मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही- नारायण राणे

सिंधुदुर्ग | राणे काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर सातत्याने फोन करत होते हा शिवसेना नेते विनायक राऊत यांचा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी फेटाळून लावला आहे.

मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही. मी माझ्या हिंमतीवर वैद्यकीय महाविद्यालय उभारलं आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी बोलत होते.

विनायक राऊत माझ्यावर आकसापोटी टीका करतात. मुळात वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य सरकार नव्हे तर केंद्रातून परवानगी मिळते. त्यामुळे विनायक राऊत यांचं वक्तव्य म्हणजे त्यांचे अज्ञान दाखवणारे आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.

दरम्यान, नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते, असं विनायक राऊत म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात अपघातांचं सत्र सुरुच, सकाळपासून एकापाठोपाठ चार अपघात

चेंडू छेडछाडीनंतर हे वाईट कृत्य करताना स्मिथ सापडला रंगेहात; पाहा व्हीडीओ

पंचांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार पेनला आयसीसीने दिला झटका!

खळबळजनक! नालासोपाऱ्यात घराबाहेर पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला उचलून तिच्यावर बलात्कार

सीरम इंस्टिट्यूटचा मोठा करार; फिलीपींस सरकारला इतक्या कोटी कोविशिल्ड लसीचा पुरवठा करणार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या