बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अमित शहांना आव्हान देण्याची उद्धव ठाकरेंची औकात आहे का?”

नवी दिल्ली | उद्धव ठाकरे यांच्याएवढा खोटारडा माणूस मी आयुष्यात कधीही पाहिला नाही. युतीमध्ये असताना मला मंत्रीपद मिळू नये म्हणून उद्धव ठाकरे अमित शाह यांना फोन करत होते. अडीच वर्षात केवळ तीन तासामध्ये हे मंत्रालयात बसले, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलीये.

आज त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी उद्धव ठाकरेंना विविध मुद्द्यांवरून घेरलं आहे. तसंच आदित्य ठाकरे यांच्या भाषेवरूनही त्यांनी डिवचलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आधी पुरुषांसारखं बोलावं, असं राणे म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांनी काल दारू पिऊन भाषण केलं, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणावर टीका केली आहे. तसेच अमित शहांना आव्हान देण्याची उद्धव ठाकरेंची औकात आहे का?, असा सवाल त्यांनी केलाय.

तुम्ही अजून सुटला नाही, ईडी तुमच्या मागे आहे, आदित्यही सुशांत सिंह प्रकरणात तुरुंगात जाणार, असा इशाराही त्यांनी दिला.

उद्धव ठाकरे यांना आता गटप्रमुख आठवले, अडीच वर्षात सत्तेत असताना त्यांनी किती गटनेत्यांना भेटी दिल्या, त्यांना मदत केली का? असा सवालही त्यांनी विचारला.

उद्धव ठाकरे यांच्याएवढा खोटारडा माणूस मी आयुष्यात कधीही पाहिला नाही. युतीमध्ये असताना मला मंत्रीपद मिळू नये म्हणून उद्धव ठाकरे अमित शहा यांना फोन करत होते. अडीच वर्षात केवळ तीन तासामध्ये हे मंत्रालयात बसले, अशी टीका त्यांनी केलीये.

थोडक्यात बातम्या- 

“किती वेळा म्हणता मी मर्द आहे, आता तपासावं लागेल”

“बापाचं नाव नाही बापाचे गुण आत्मसात कर”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More