नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला मोलाचा सल्ला, म्हणाले…
मुंबई | शिवसेनेत झालेल्या बंडामुळे आता शिवसेनेवर पुन्हा नव्याने उभे रहाण्याची वेळ आली आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक भाजप आणि त्यांचे नेते, शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. भाजपचे नेते आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आता शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
राणे हे काल सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. मी ज्योतिषी असून हे सरकार पडण्याचे भाकीत केलं होतं, ते खरं झालं, शिवसेनेेची आजची अवस्था ठाकरे पिता-पुत्रामुळेच असे राणे म्हणाले. आता शिवसेनेचे अस्तित्व संपले असून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी रहाणार नाही. शिवसेनेची सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आता गप्प घरी बसावं, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
यावेळी त्यांनी संजय राऊतांवर देखील हल्ला चढविला. संजय राऊत यांना अटक वॉरंट निघाल्याने त्यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, संजय राऊत यांनी काही ना काहीतरी गुन्हा केला असेलच, म्हणून त्यांना अटक होणर आहे. ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत.
शिवसेनेत मात्र सध्या जगण्याचा संघर्ष सुरु आहे. त्यांचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण सुद्धा आता शिंदे गटाला मिळण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना सुचना देखील केल्या आहेत. शिवसेना आता यापुढे काय निर्णय घेणार आणि पक्ष पुन्हा कसा उभा करणार हे आगामी काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
काँग्रेस नेत्याने अग्निपथ योजनेशी जोडला शिंजो आबेंच्या मृत्यूशी संबंध, म्हणाले…
शिंदे-फडणवीस अमित शहांच्या भेटीला, तिघांमधील बैठक रात्री 2 वाजता संपली
अमरनाथमध्ये ढगफुटी; आतापर्यंत 15 भाविकांचा मृत्यू
‘खाली काही घातलं की नाही?’; ‘त्या’ व्हिडीओमुळे मलायका अरोरा सोशल मीडियावर ट्रोल
‘मी व्हॅनिटी व्हॅनमध्येही सेक्स केलाय, रिस्क असते पण…’; रणवीरने सांगितला तो किस्सा
Comments are closed.