
मुंबई | आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, मात्र भाजप सरकारने ते काढून घेतलं, असा गौप्यस्फोट भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणेंनी केला आहे. ते एबीपी माझा या न्यूज चॅनेलशी बोलत होते.
आम्ही आरक्षण दिलं होतं, त्यानंतर त्यावर राजकारण झालं आणि काही लोक या आरक्षणाविरोधात न्यायालयात गेले. न्यायालयात जाणाऱ्या त्या लोकांची चौकशी करायला पाहिजे. योग्य वेळी त्या लोकांची नावे सांगेन, असंही ते म्हणाले.
सगळे घटनात्मक पेच सोडवता येतात, राणे समितीनं यावर अभ्यास केला आहे. मराठ्यांचा सामाजिक, आर्थिक सर्व्हे केल्यानंतर राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार मिळतो. त्याप्रमाणे अधिकारांचा वापर करून ते आरक्षण देऊ शकतात. अहवाल येण्याआधी वाद निर्माण करणं योग्य नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, तांत्रिकदृष्ट्या अहवालात मराठा आणि कुणबी दोघांना बसवलं आहे का हे पाहावे लागेल. त्यानंतर मी अहवालावर बोलेन, असंही राणेंनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-भाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश
-हिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा!
-दारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार!
-प्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली!
-मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप