बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणे मुख्यमंत्र्यांसमोर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…

सिंधुदुर्ग | राज्यातील सिंधुदुर्गमधील बहुचर्चित चीपी विमानतळाच्या उद्घाटनाचा सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्यातील इतर मंत्री आणि आमदारांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमतहाच समोरासमोर आले. राणे यांनी बोलताना म्हटलं की या विमानतळाचं पूर्ण श्रेय हे आपलंच असल्याचं बोलून सांगितलं. मी बाळासाहेब आणि उद्धवजी यांच्या प्रेरणेनेच विकास केला आहे, असं राणे म्हणाले.

या कार्यक्रमात राणेंनी बोलताना सर्व मान्यवरांची नावे घेतली. माझ्या आयुष्यातील हा अत्यंत चांगला क्षण आहे. अशा ठिकाणी राजकारण करू नये, असं वाटतं. त्यासाठीच मी आज येथे आलो आहे. व्यासपीठावर मुख्यमंत्री भेटले. ते काहीतरी बोलले ते माझ्या कानावर आले. मी एक शब्द ऐकला, असं राणे म्हणाले.

दरम्यान, पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांनी यावं, पाच सहा लाख खर्च करावेत. तसेच यामुळे सिंधुदुर्गच्या लोकांना रोजगार मिळावा, हेच या चिपी विमानतळाचा उद्देश होता. मला 1990 ला बाळासाहेबांनी माझी कोकणासाठी गरज आहे म्हणून मला पाठवलं, असा जुन्या आठवणींना उजाळा नारायण राणेंनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही”

राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेचाही आर्यनला पाठिंबा?, अरविंद सावंतच्या वक्तव्यानं खळबळ

‘शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात’; ‘या’ भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

राजू शेट्टींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले…

अविनाश भोसले यांच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More