नवी दिल्ली | माजी काँग्रेस नेते आणि भाजपचे सहयोगी खासदार नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होत होती. मात्र काँग्रेस पक्षात पुन्हा जाणार असल्याच्या बातम्यांत काहीही तथ्य नाही. माझा काँग्रेसशी कसलाही संबंध नाही, असा खुलासा खासदार नारायण राणे यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणामुळे मी दिल्लीत आलो आहे. माझं कोणाशी बोलणं झालं नाही आणि मी कुणाला भेटलोही नाही, असं राणे म्हणाले.
दिल्लीत आल्यावर मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांच्या दालनातच टीव्हीवर मला ही बातमी दिसली. मात्र या बातमीत कोणतंही तथ्य नाही. असंही राणे म्हणाले.
नारायण राणे आज(शनिवार) गोव्यामार्गे दिल्लीला रवाना झाले होते. त्यामुळे नारायण राणे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार या शक्यतेने चांगलाच जोर धरला होता.
महत्वाच्या बातम्या
-मस्ती अंगलट आली!; या दोन आमदारांसह 25 ते 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
-नारायण राणेंच्या काँग्रेस प्रवेेशाबाबत हर्षवर्धन पाटील म्हणतात…
-पराभव विसरून शरद पवार लागले कामाला; दिल्या शब्दावर ठाम
-इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो,’ मला अजूनही ‘या’ दोन क्रिकेटपटूंची भीती वाटते’
-ते काँग्रेसमध्ये जाणार नाहीत… बुडत्या नावेत कोण बसणार??- देवेंद्र फडणवीस
Comments are closed.