बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांत सिंह प्रकरणावर नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपुतने आत्महत्या केल्यानंतर सिनेसृष्टीत सर्वांनाच धक्का बसला होता. सुशांतच्या आत्महत्येनतर मात्र राज्यात या घटनेला राजकीय वळण मिळालं होतं. अशातच आता परत एकदा सुशांत सिंह प्रकरणामुळं राज्याचं राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सुशांत सिंह प्रकरणावर भाष्य केलं आहे.

सुशांत सिंह प्रकरणाचा उल्लेख करत राणेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. खासदार विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात जोरदार कलगीतूरा रंगला. विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी आहे, असं नारायण राणे म्हणाले आहेत. लवकरच सुशांत सिंह प्रकरण व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली, असं राणे म्हणाले. त्यांचीही चौकशी परत होईल, असंही राणे म्हणाले आहेत.

सुशांत सिंह प्रकरणाची चौकशीच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचं कळलंय. विनायक राऊत हे घडल्यावर आपले बॉस आणि आपण कुठे धावणार?, असा सवाल राणेंनी राऊत यांनी विचारला आहे. परिणामी शिवसेना आणि राणे यांच्यातील वाद आता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, राणे आणि शिवसेनेतील वादामुळं राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. भाजपकडून वारंवार महाविकास आघाडी राणेंना त्रास देत असल्याची टीका करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या – 

चंद्रकांत पाटलांनी दिला उद्धव ठाकरेंना सल्ला, म्हणाले “रश्मी ठाकरेंना सामनाच्या…”

धोनीच्या चेन्नईने कोट्यावधींना विकत घेतलेल्या ‘या’ युवा खेळाडूवर गंभीर आरोप

“पवार कुटुंबीयांचे शेअर्स आहेत की नाहीत…”; राजू शेट्टींचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

लेकीमुळं उद्भवला शिवसेना-राष्ट्रवादी वाद; अखेर बाबांना द्यावं लागलं स्पष्टीकरण

‘मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी शिवसेनेने दिली’, किरीट सोमय्यांच्या दाव्याने नवी खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More