सिंधुदुर्ग | ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं धाडस केलं. तेव्हा उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं, असं भाजप नेते नारायण राणे यांनी सांगितलं आहे.
नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नारायण राणे बोलत होते.
आमच्या काही डॉक्टरांना विचारलं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं? तुम्ही ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरु करण्याचं धाडस केलं. त्यासाठीदेखील तशाच धाडसी माणसाच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवं. त्यासाठीच मी दिल्लीत गेलो. त्यांना सांगताच, त्यांनी येणार असं आश्वासन दिलं. ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मी गेल्या अनेक वर्षात राज्यभरात भरपूर काम केलंय, असंही राणे म्हणाले.
दरम्यान, विकास कामांना विरोध आणि उद्धाटनाला आयत्या बिळावर नागोबा म्हणजे शिवसेना, असं म्हणत राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला.
थोेडक्यात बातम्या-
मी बंद खोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे खोटं बोलले- अमित शहा
“महाराष्ट्रात कोणी चाणक्य बिणक्य चालणार नाही”
नारायण राणे विनोद करतात, हे मला माहीत नव्हतं- शरद पवार
“राणेंसारख्या नेत्यांना कसं सांभाळायचं आम्हाला माहीती आहे, त्यांच्यावर अन्याय होणार नाही”
मुंबई पोलिसांकडून या बड्या अभिनेत्रीला अटक, कारण आहे अत्यंत धक्कादायक