बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात…’; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या झालेल्या सीबीआय चौकशीबाबतही नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात जी नावं घेतली आहेत त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी अनिल परब यांचं नाव घेतलं आहे. या प्रकरणात पुढचा नंबर अनिल परब यांचा असेल असं आम्ही उगाच म्हटलं नव्हतं, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

अनिल परब हे सेवाभावी मंत्री आहेत. अजिबात कमिशन न घेता जमा करायचं आणि आणून द्यायचं. हे त्यांचं काम आहे. त्यांची चौकशी सेवा आणि मेवा कसा गोळा केला आणि कुठे पोहोचवला, यासाठी ही चौकशी चालली आहे. सीबीआय चौकशीचा अहवाल 15 दिवसांच्या आत जाहीर होईल, असं नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

सीबीआयच्या चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर अनिल देशमुखांचं खरं रूप आणि ते कुणाच्या सांगण्यावरून हे करत होते त्यांचा भांडाफोड होईल. तसेच अनिल परब हे चौकशीसाठी तयार नसतील तर त्यांना उचलून चौकशीला नेलं जाईल. मात्र त्याआधी त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असं नारायण राणे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

आंबेडकर जयंतीला मिळालेल्या देणगीच्या वाटणीवरुन वाद, एकाची हत्या

“इथं माणसं मरत आहेत, तुम्ही मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?”

पोलीस आयुक्तांनी पुणेकरांना सोडवायला दिलंय ‘हे’ कोडं; पाहा तुम्हाला सुटतंय का!

“महाराष्ट्राची बाजू कमजोर करण्याचं पाप शिवसेनेनं केलंय”

‘पुढचे चार आठवडे अतिशय महत्त्वाचे’; कोरोनाच्या प्रसाराबाबत तज्ज्ञांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More