पत्रकाराच्या प्रश्नावर नारायण राणे म्हणाले,’कोण संभाजीराजे?’

मुंबई | भाजप खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच यावेळी नारायण राणेंनी विविध विषयांवर भाष्य केलं.

पत्रकारांनी यावेळी नारायण राणेंना गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’  या पुस्तकाबाब विचारलं. तसेच भाजप नेते आणि संभाजीराजेंनी देखील यावर नाराजी व्यक्त केली असं पत्रकारांनी सांगितलं. यानंतर कोण संभाजीराजे? असं नारायण राणे म्हणाले.

मराठा समाज आक्रमक समाज आहे. आम्ही निषेध करून गप्प नाही बसणार, असं नारायण राणे म्हणाले. यापूर्वी नारायण राणेंनी ट्विट करत गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध व्यक्त केला. कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केलं याची माहिती मिळाली पाहिजे. गिरीश कुबेर तुम्ही मर्यादा सोडून हे लेखन केलं आहे, त्यामुळे मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही, असं ट्वीट नारायण राणे यांनी केलंय.

दरम्यान, गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra’ या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह लेखन केले आहे. या लेखनाबद्दल गिरीश कुबेर यांचा मी जाहीर निषेध करतो. त्यांच्या या लेखनामुळे मराठा समाजाला दुःख वाटत आहे, असं नारायण राणे यांंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

यास चक्रीवादळाचं कव्हरेज करताना महिला पत्रकार ढसा ढसा रडली, पाहा व्हिडीओ

शिवसेना नगरसेवकाची दादागिरी; तरूणाला लोखंडी राॅडने मारहाण

मुलगी जवळ येताच गाढवानं केलं असं काही की ते पाहून तुम्हीही चकित व्हाल, पाहा व्हिडीओ

बायकोच्या मैत्रीणीच्या प्रेमात आकंठ बुडाला; त्यानंतर त्याने जे पाऊल उचललं ते अत्यंत धक्कादायक!

राज्यासाठी हे मुख्यमंत्री लायक नाहीत- नारायण राणे

BjpMPNarayan RaneSAMBHAJIRAJEखासदारनारायण राणेभाजपसंभाजीराजे