बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी वेळ देत नाही, ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल”

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार पडेल असे म्हणत आहेत, मात्र सरकार पडताना दिसत नाही. त्यावर आपली प्रतिक्रिया काय, असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. यावर चंद्रकात पाटील यांनी हे सरकार केव्हा पडेल अशी वेळ कधीही दिलेली नाही, की हे सरकार एक महिन्यात पडेल की दोन महिन्यात पडेल. पडेल, पडेल. आज ना उद्या पडेल, असं नारायण राणे म्हणाले.

संजय राऊतांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत काय माझा बॉस आहे का? मी त्याच्या प्रश्नाला का उत्तर देऊ, असंही राणे म्हणाले. तसेच राऊतांनी एकदा तर 25 वर्षे सत्तेत राहू असा दावा केला होता. ते काय घेऊन बोलतात माहिती नाही. पाणी पितात की अजून काही… अशा शब्दात राणे यांनी राऊतांवर खोचक टीका केली आहे.

जो माणूस आपलं पाप लपवायला बघतो. आपल्या पापांवर पांघरुण घालण्यासाठी दिखावूपणे का होईना पण बोलावं लागतो. संजय राऊतही तेच करतात. पंतप्रधान मोदी यांच्या नावावर मतं मिळवायची आणि जिंकून आल्यावर दुसरीकडे जायचं, असा टोला राणेंनी राऊतांना लगावलाय.

तुमचं सरकार पाच वर्षे टिकणार असेल तर तुम्हाला सतत बोलावं का लागतं. सरकार पाच वर्षे टिकणार हे सांगणं म्हणजे आपला दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही दुबळे आहात, त्यापासून पळण्याचा प्रयत्न म्हणजेच राऊतांचं वक्तव्य असल्याचा टोला शेलार यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘नवज्योतसिंग सिद्धूंचे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत …’; अमरिंदर सिंग यांनी केले गंभीर आरोप

‘राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक नसतील तर…’; शशी थरूर यांचं मोठं वक्तव्य!

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ‘हे’ पाच महारथी आघाडीवर, जाणून घ्या!

पुणे कोरोना अपडेट, वाचा आजची आकडेवारी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More