महाराष्ट्र मुंबई

ठाकरे सरकार कधी पडेल हे मी आता सांगणार नाही, कारण…- नारायण राणे

मुंबई | हे सरकार कधी पडेल हे मी सांगणार नाही. मी सांगितलं तर सर्व फेल जातं. म्हणून मी काही सांगणार नाही, असं भाजप नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सरकारी यंत्रणा हाताळण्याचे ज्ञान, अभ्यास नाही. त्यांना ना खड्डे माहिती आहे, ना राज्याची तिजोरी माहिती आहे, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हायला हवं, असे सांगितलं होते. पण साहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठं वाटतं. उद्धव ठाकरेंनी लाचारी करुन पद मिळवलं. त्याही पदाचा घरात बसून वापर होत नाही. संभाजीनगर नाव करा, अशी हूल देत आहे. पुत्र मुख्यमंत्री असताना त्याची पूर्तता होत नाही, हे दुर्देव आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलंय.

दरम्यान, आम्ही होतो ती शिवसेना वेगळी होती, ही शिवसेना वेगळी आहे, असंही नारायण राणे यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“धनंजय मुंडे यांचा जीव शरद पवार नावाच्या पोपटात अडकला आहे”

“कुठल्या तरी कंपनीत ड्रायव्हर म्हणून जायचं, हे चुकून इकडं आलेत”

“जनतेला ठाकरे सरकारचा कंटाळा आला आहे”

श्रीपाद नाईक यांचा रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या