मुंबई | बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून अजून संयमाने गप्प बसलो आहे. आमच्याकडे नजर फिरवू नका. आम्ही नजर फिरवली तर कपडे सांभाळत पळता भुई थोडी होईल, असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय.
कुणाला दादागिरीची भाषा, कुणाला वाघाची भाषा ? शेळपट आहेत. मराठी माणसासाठी शिवसेना म्हणतात, मुख्यमंत्री झाल्यावर काय केलं यांनी. नोकऱ्यांचा प्रश्न आहे. मोदींना सांगतात हे करुन दाखवा म्हणून. मोदींनी जे केलं त्याच्या काही अंश देखील उद्धव ठाकरेंना करता आलं नाही, असं नारायण राणे म्हणालेत.
दसरा मेळाव्यातील भाषण केवळ विरोधकांवर टीका करण्यासाठी होतं. हे मुख्यमंत्री थापाबाज आणि दिशाभूल करणारे आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केलीये.
हे खेळण्यातील मुख्यमंत्री आहेत. ते तरी दुसऱ्याच्या हाताने नाचतात, यांना नाचताही येत नाही. त्यांचं दसऱ्याचं भाषण महाराष्ट्राचं अधोपतन करणारं आहे, अशी बोचरी टीका राणेंनी केलीये.
महत्वाच्या बातम्या-
“उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी राहण्याची लायकी नाही”
‘मुख्यमंत्र्यांच्या भाषणात भाजपची दहशत याचाच आनंद’; भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
…तर आमचाही तोल जाईल आणि मातोश्रीच्या आतल्या गोष्टी बाहेर काढेन- नारायण राणे
रामदास आठवलेंच्या उपस्थितीत अभिनेत्री पायल घोषचा ‘आरपीआय’मध्ये प्रवेश!
Comments are closed.