Top News महाराष्ट्र मुंबई

पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील- नारायण राणे

File Photo

मुंबई |  केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात ठाकरे सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राजधानीमध्ये चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठींबा दर्शवला आहे. यासाठी 23, 24 आणि 25 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होणार आहे.

यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार हे सहभागी होणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते

सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. एसटीचे पगार दोन तीन महिने होत नाहीत, बेस्टचंही तसंच आहे. सरकारची अवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे आधी ते सुधारा मग रस्त्यावर या. आमचा काय रस्त्यावर येण्यासाठी नकार नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निदान मातोश्रीतून मुख्यमंत्री बाहेर तरी पडतील. पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील, असं म्हणत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

  ‘जे शेतकरी आत्महत्या करून स्वतःच आयुष्य संपवतात ते मनाने कमकुवत असतात’; कर्नाटकच्या कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

“राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा”

“शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा आंदोलनातील सहभाग म्हणजे निव्वळ ढोंगीपणा”

“जे काम ठाकरे सरकारला करायला हवं होतं ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी केलं”

“लोकांना अंधारात ढकलणाऱ्या सरकारला गाडून टाका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या