बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

योगींचं थोबाड फोडण्याची भाषा योग्य होती का?- नारायण राणे

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. त्यामुळे राणेंना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना काल रात्री उशिरा महाड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन दिला. आज मुंबईला पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

मला राष्ट्राबद्दल प्रेम आहे म्हणुन मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अज्ञानपणा दाखवुन दिला, असं नारायण राणे म्हणाले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जी टीका केली होती. ती योग्य होती का असे सवालही राणेंनी पत्रकार परषदेत केले.

हा योगी आहे का ढोंगी, चप्पलांनी त्याच थोबाड फोडलं पाहिजे, असं म्हणत उध्दव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केलं होत. हाच का त्यांचा सुसंकृतपणा?, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत वापरलेला निर्लज्जपणा हा शब्द बरोबर होता का?, तसेच हा संसदीय शब्द आहे का? असे प्रश्न नारायण राणे यांनी केले आहेत.

दरम्यान, शरद पवार साहेब तुम्ही याला मुख्यमंत्री केला आणि याचा सुसंस्कृत बघा, त्याला मुख्यमंत्री केलं हे तुमच चुकलं अस मला वाटत नाही, असं म्हणत राणेंनी पवारांवरही निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या- 

म्हाडाच्या 8984 सदनिकांसाठी सोडत, अर्ज नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु!

नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले….

तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघ ऑलआऊट, फलंदाजी ढेपाळली!

‘अशा’ पद्धतीचं शिक्षण घेण्यास कोणाचाच नकार नसेल, पाहा व्हिडीओ

राखी सावंतला चावला कुत्रा?, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More