बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा- नारायण राणे

मुंबई | मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोेलीस आयुक्त यांची राज्य सरकारकडून उचलबांगडी करण्यात आली आहे.  मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार हेमंत नगराळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपमधील नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे तर शिवसेनेवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. अशातच भाजप नेते नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.

माझ्या मते सचिन वाझे यांचा पूर्वोतिहास पाहता पोलीस खात्यात परत घेणं तसेच मनसुख हिरेन आणि अन्य हत्या. या सर्वांना जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणेंनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

सचिन वाझे निलंबित असताना खात्यात घेणं क्राईममध्ये पोस्टिंग देणं, त्यांना प्रत्येक वेळी संरक्षण देणं आणि वाझे यांच्यावर कारवाई करण्यात विलंब लावणं, विरोधी पक्षाच्या दबावामुळे वाझे यांच्यावर कारवाई करणं त्यातच मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली होणं  या सर्वांना राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं नारायण राणेंनी म्हटलं आहे. याआधी देवेंद्र फडणवीसांनीही शिवसेनेवर टीका केली आहे.

दरम्यान, सचिन वाझेंचं इतकं खराब रेकॉर्ड असताना क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये सचिन वाझेंना घेतलं. मात्र हे पोलीस निरीक्षकाचं पद आहे परंतू एपीआयला घेतलं गेलं. कोणतीही केस सीआययू कडे येते आयुक्तानंतर सचिन वाझेंचं पद मोठं होतं. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद, शिवसेना मंत्र्यांसोबत वाझे दिसत होते. वाझे वसूली अधिकाऱ्याच्या रूपाने बसवले गेले असल्याचं फडणवीस म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या- 

‘सचिन वाझे शिवसेनेचे वसुली एजंट’; देवेंद्र फडणवीसांकडून आणखी धक्कादायक आरोप

महिला फाटलेल्या जीन्स घालतात हे बरोबर आहे का?; भाजपच्या मुख्यमंत्र्याचा सवाल

भारताचा पराभव विराट कोहलीच्या जिव्हारी, ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता

झोमॅटो बाॅय प्रकरणात तनुश्री दत्ताची एंट्री, परिणीती चोप्राला तनुश्रीचा सवाल, म्हणाली…

‘एखाद्या वावटळीत पोलीस दलाची…’; परमबीर सिंग यांच्या बदलीवर संजय राऊतांचं ट्विट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More