Top News महाराष्ट्र मुंबई

“जनतेला ठाकरे सरकारचा कंटाळा आला आहे”

मुंबई | जनतेला ठाकरे सरकारचा कंटाळा आला आहे. सरकारच्या काळात भ्रष्टाचारही वाढू लागला आहे, असं भाजप खासदार आणि नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते

उद्धव ठाकरे प्रचारा दरम्यान शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून 50 हजार देणार बोलले होते. त्याचं काय झालं? किमान 10 हजार तरी द्यावेत. उद्धव ठाकरेंनी समजावून सांगावं राज्यातल्या तिजोरीत किती पैसे आहेत?, राज्याची अर्थव्यवस्था काय आहे?, असं नारायण राणे म्हणाले.

शेतकऱ्यांना माल कुठेही विकण्याची परवानगी आहे. हे चुकीचं आहे का ? मग विरोध कशाला? धान्य आणि भाजा मातोश्रीत नेऊन विकायच्या का? तो दरवाजा, पिंजरा बंदच असतो. मग विकायचा कुठे?, असा सवालही राणेंनी केला आहे.

दरम्यान, येत्या निवडणुकांमध्ये भाजपच बाजी मारेल. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादीत केलं त्याबद्दल मी जनतेचे आभार व्यक्त करतो. महाविकास आघाडी सरकारवरून लोकांचा विश्वास उडाला असल्याचं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील- नारायण राणे

‘जे शेतकरी आत्महत्या करून स्वतःच आयुष्य संपवतात ते मनाने कमकुवत असतात’; कर्नाटकच्या कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्

“राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा”

“शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा आंदोलनातील सहभाग म्हणजे निव्वळ ढोंग

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या