“एखाद्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर आहे”
मुंबई | सध्या राज्यभर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे. या आत्महत्या प्रकरणामध्ये शिवसेना नेते संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. विरोधी पक्षानेही हे प्रकरण लावून धरलं आहे. अशातच भाजप नेते नारायण राणे यांनीही या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
ठाकरे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ, ताकद देत आहे. इथं कुंपणच शेत खात आहे. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियान आणि आता पूजा चव्हाण प्रकरणात तेच होत आहे. एखाद्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर असल्याचं नारायण राणेंनी म्हटलं आहे.
सरकारमधील अनेक मंत्र्यांवर बलात्कार, हत्या सारखे गंभीर आरोप झाले. पण ठाकरे सरकारकडून सगळ्यांना अभय देण्याचं काम सुरु असल्याची टीका नारायण राणेंनी केली आहे. त्याचबरोबर या लोकांना अत्याचार करायला लायसन्स दिलंय काय?, असा सवालही राणेंनी सरकारला विचारला आहे. यावेळ राणेंनी शिवसेनेवरही टीका केली आहे.
दरम्यान, शिवसेना आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. स्वाभिमान आणि अभिमान नसलेली आताची शिवसेना आहे. साहेबांच्या वेळेला वेगळी शिवसेना होती. महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाहीत. उद्धव ठाकरे हे मातोश्रीचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्र सरकारची तिजोरी खाली आहे, असं नारायण राणे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल- उद्धव ठाकरे
लग्नाआधीच्या प्रेयसीसोबतची ऑडिओ क्लीप पत्नीने ऐकली अन् मग….
या लोकांना महिलांवर अत्याचार करायला सरकारने लायसन्स दिलंय काय?- नारायण राणे
“देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे आता जोडीने मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहत बसतील”
‘…पण भाड्याचं घर शेवटी भाड्याचं असतं’; कंगणा राणावतचा ट्विटरला टोला
Comments are closed.