Top News महाराष्ट्र

राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं?- नारायण राणे

मुंबई | केंद्राच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी या कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका करत असतात. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणेंनी गांधींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं?, ते शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याच्या गोष्टी करतात, असं म्हणत गांधींनी राणेंवर टीका केली. केंद्राच्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ आज कणकवलीमध्ये भव्य रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान मोदींकडून एका बाजूला देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या बाजूला नागरिकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या देशाचा प्रमुख घटक शेतकरी आहे असल्याचं राणे म्हणाले.

दरम्यान, कणकवलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी!

स्व. मोहनलालजी बियाणा पत्रकारिता सन्मान!; राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा

“…तोपर्यंत शिवसेना औरंगाबादचं नामांतर करूच शकत नाही”

प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांना मोठा झटका!

राष्ट्रगीत सुरु असताना भारताचा ‘हा’ खेळाडू भावुक; सिडनीच्या मैदानावर अश्रू अनावर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या