Top News महाराष्ट्र सिंधुदुर्ग

सचिन तेंडुलकरचा फोटो जाळणं हा राष्ट्रद्रोह- नारायण राणे

सिंधुदुर्ग | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिल्लीमध्ये चालू असलेल्या आंदोलनाबाबत ट्विट केल्यामुळे सचिनवर देशभरातून टीका होताना दिसत आहे. मात्र भाजप नेत्यांनी सचिनची बाजु लावून धरली आहे. अशातच भाजप नेते नारायण राणेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन तेंडुलकरचा फोटो जाळणं हा राष्ट्रद्रोह आहे, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.  राणे पत्रकार परषदेत बोलत होते. राणेंच्या आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही सचिनवर होत असलेल्या टीकेवरून राज्य सरकारला सवाल केला होता.

केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?,असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, देश एकसंघ आहे! असं म्हणणं किंवा देशाच्या एकतेच्या बाजूने बोलणं गुन्हा आहे का?, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी सत्य स्थिती विशद केली म्हणून त्यांचा अपमान करणाऱ्यांनी भारतीय क्रिकेट प्रती असलेले योगदान विसरता कामा नये, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

नवरदेवाच्या वागण्यानं स्टेजवर एकच गोंधळ; नवरीही झाली आऊट ऑफ कंट्रोल, पाहा व्हिडीओ

“भरणे मामा मंत्री झाले, मी मंत्री झालो… आम्ही कधी जॅकेट घातलं का?”, या नेत्याला अजितदादांचा टोला

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; पाहा काय आहे प्रकरण…

अमित शहांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं- नारायण राणे

कृषी कायदे शेतकरी आणि मजूरांसाठीच नाहीतर देशातील जनतेसाठीही घातक- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या