बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मंत्रिपदासाठी पैसे दिलेत, ते वसूल झाल्याशिवाय राजीनामा कसा देईल?”

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केली त्यानंतर सोशल माध्यमांवर काही ऑडिओ क्लिप आणि फोटो व्हायरल झाले होते. यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट संजय राठोड यांच्यावर आरोप केले होते. मात्र त्यावेळी राठोड माध्यमांसमोर आले नसल्याने ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदर राठोड यांनी आपला राजीनामा दिला. मात्र अशातच भाजप नेते नारायण राणेंनी या प्रकरणावरून सरकारला टोला हाणला आहे.

संजय राठोड राजीनामा कसा देतील, त्यांनी मंत्रिपदासाठी पैसे दिलेत ते पैसे वसुल झाल्याशिवाय कसं होईल, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तर राज्याचा मंत्री फरारा कसा असू शकतो?, असा सवालही राणेंनी यावेळी बोलताना केला आहे. त्यासोबतच मंत्र्याला पोलीस संरक्षण असताना मंत्री फरार कसा होऊ शकतो असंही राणे म्हणाले.

बीडच्या परळी वैैजनाथमधली पूज चव्हाण या तरूणीने पुण्यातील महंमदवाडी येथे 8 मार्चला सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली होती. त्यानंतर काही फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये कथित मंत्री आणि अरूण राठोड नावाचा तरूणाचा संभाषण होतं. त्यानंतर काही फोटोही व्हायरल झाले होते यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राजीनामा देणार नसतील तर आम्ही राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येणार नसल्याचं विरोधी पक्षाने सांगितलं होतं. त्यानंतर राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला.

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी

भारताची खराब सुरुवात; केएल राहूल पाठोपाठ विराट शुन्यावर बाद

“…तर 100 दिवसात पुण्यातील लोकसंख्येचं लसीकरण होऊ शकतं”

2 फुटी असल्याने लग्न जमेना, थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पोलिसांनाच म्हणाला; मॅडम…

बारामतीचे व्हायरल लावणीसम्राट रिक्षाचालक बाबजी कांबळे यांना थेट चित्रपटात काम करण्याची ऑफर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More