मुंबई | भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार टीकेचे बाण सोडले आहेत. यावेळी बोलताना राणेंनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेनेने आजच्या अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावर राणेंना प्रश्न विचारण्यात आला. संजय राऊत संपादकाच्या लायकीच्या नाहीत, अशी घणाघाती टीका राणे यांनी संजय राऊतांवर केली आहे.
नारायण राणेंनी बोलताना उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावरही स्पष्टीकरण दिलं आहे. मला माझ्या राष्ट्राचा अभिमान आहे, म्हणून मी ते वक्तव्य केलं, असं स्पष्टीकरण देखील नारायण राणे यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा योगी आदित्यनाथ यांच्यावर वक्तव्य केलं होतं ते बरोबर होतं का?, असं नारायण राणे म्हणाले.
दरम्यान, मी काय असं बोललो होतो? ज्याचा एवढा राग आला. मला राजकारणाला 52 वर्ष झाली. आतापर्यंत शिवसेनेने असे शब्द कधी उच्चारले नाहीत का, असा सवालही राणेंनी केला आहे. राणेंनी राऊतांवर केलेल्या टीकेवर राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
विलासराव देशमुखांचा जुना व्हिडीओ शेअर करत रितेशचा राजकारण्यांना सल्ला; पाह व्हिडीओ
प्रेम आंधळ असतं! प्रियकरावर विश्वास ठेवत प्रेयसीने मारली उलटी उडी अन्…; पाहा व्हिडीओ
पुणेकरांची चिंता वाढली! एका दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ
भाजपचा सेनेला पहिला धक्का! रश्मी ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल
योगींचं थोबाड फोडण्याची भाषा योग्य होती का?- नारायण राणे
Comments are closed.