मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात विरोधकांना धारेवर धरत जोरदार टीका केली. यामध्ये त्यांनी राणे पिता-पुत्रांवरही टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणेंनी उद्धव टाकरेंवर टीका करत शिवसेना नेते संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे.
शिवसेना 25 वर्षे सत्तेत राहील, असा दावा खासदार आणि शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. यावर शिवसेना 25 वर्षे सत्तेत राहणार? कोणत्या धुंदीत आहात?, असा सवाल करतानाच संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.
आमचं सरकार पाडा असं आव्हानही राऊतांनी दिल. त्यासोबतच 200 कोटी दिल्लीहून आणा, असंही राऊत म्हणाले होते. यावर दिल्लीतील नेते राऊत यांना विचारूनच निर्णय घेतात अशा अविर्भावात ते बोलत होते, असं म्हणत राणेंनी राऊतांवर निशाणा साधला.
दरम्यान, राणेंनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे यावर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून गप्प बसलोय, आमच्याकडे नजर फिरवू नका नाहीतर…- नारायण राणे
“सुशांतची केस अजून संपलेली नाही, आदित्य ठाकरे खुनाच्या आरोपाखाली गजाआड जाणार”
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार?”
“उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी राहण्याची लायकी नाही”
‘मुख्यमंत्र्यांच्या भाषणात भाजपची दहशत याचाच आनंद’; भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
Comments are closed.