बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला धमकी”

मुंबई | महाविकास आघाडी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अधिक जोमानं एकसोबत निवडणूक लढणार असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी म्हटलं होतं. पवारांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नारायण राणेंनी आपलं मत मांडलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असं म्हणाले आहेत. जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नसल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  शरद पवारांनी ही काँग्रेसला दिलेली धमकी आहे.  शरद पवार जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो, असंही नारायण राणे यांनी यांनी सांगितलं आहे. यावर आता ठाकरे सरकारमधील नेते काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येईल, असं लोकांना कधीच वाटलं नव्हतं. पण आपण एकत्र आलो. पर्याय दिला. लोकांनी हा पर्याय स्वीकारला असून आपली यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. कुणी काही म्हणो, सरकारची वाटचाल दमदार सुरू आहे, असं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनाच्या कार्यक्रमात म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या- 

भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याची घरवापसी, मोदींचा तो फोन कॉलही नाही रोखू शकला

बाबो तापसी पन्नूने बोल्ड अंदाजात लावली आग, व्हिडीओ तुफान व्हायरल

अनोखा निर्णय! कोरोना लस घेतली नाही तर ‘या’ ठिकाणी केलं जाणार मोबाईलचे सीमकार्ड ब्लाॅक

“लोकांचे बाप काढणाऱ्या महापौरांनी शहाणपण शिकवू नये”

धक्कादायक! कोरोनाकाळात ऑनलाईन फ्रॉडची वेगानं वाढ; देशाचं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More