बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकहित जपणं याचा शिवसेनेशी काहीही संबंध राहिलेला नाही- नारायण राणे

मुंबई | अतिवृष्टीवरून विरोधी पक्ष भाजप राजकारण करत असल्याची टीका करत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला होता. या टीकेला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि मुख्य सचिव यांच्या पाहणीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे आपला फौजफाटा घेऊळ तळीयेमध्ये पोहोचले. आता मागोमाग राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीसुद्धा येणार आहेत. सरकारी यंत्रणा कामामध्ये गुंतली असतान या पर्यटनामुळे गोंधळात गोंधळ उडाला असल्याचं शिवसेनेच्या अग्रलेखात म्हटलं होतं. यावरून नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका केली आहे.

जनता आता समोर येऊन राग व्‍यक्‍त करु लागल्‍यामुळे शिवसेना हादरुन गेली आहे. त्‍यामुळेच सामनामध्‍ये एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकहित जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरुन सिध्‍द होते, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला आहे.

दरम्यान, लोकांच्या संकटाचं राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्‍याचं कौतुकही करुन घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्याना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू, असंही राणे म्हणाले. यावर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘वाढदिवसानिमित्त काय भेट देणार?’; भास्कर जाधव म्हणाले, ‘स्वच्छ सुंदर चिपळूण’

चार दिवसांनंतर सोन्याच्या दरात मोठे बदल, वाचा ताजे दर

“उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा नाही, असं राऊतांना वाटतं”

श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव; ‘या’ खेळाडूला झाली कोरोनाची लागण, आजचा टी-20 सामना रद्द

…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची शौर्यगाथा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More