बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंनी स्वखर्चाने एखादी बालवाडी काढुन दाखवावी- नारायण राणे

मुंबई | बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहात त्यामुळेच तुम्ही कोकणासाठी सरकारी मेडिकल कॉलेज मागितलं नाही तर लोक स्वत:साठी मेडिकल कॉलेज मागतात, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप नेते नारायण राणेंवर निशाणा साधला होता. कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरेंच्या या टोल्याला नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेलं आहे. सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी, असं म्हणत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. यासंदर्भात राणेंनी ट्विट केलं आहे.

तुम्ही रत्नागिरीसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मागितलं. तुम्ही स्वत:साठी काही मागितलं असतं पण तुम्ही ते केलं नाही. काही लोकं असतात इकडे तिकडे काही करून स्वत:साठी काही तरी मागतात. तुम्ही मात्र कोकणासाठी सरकारी कॉलेज मागितलं. याचा मला अभिमान वाटत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, नारायण राणेंनी कोकणात कुडाळा तालुक्यात खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल बांधलं आहे. या महाविद्यालयाच्या आणि हॉस्पीटलच्या उद्घाटनासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा आले होते. राणेंच्या या टाकेवर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येतं हेे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘कोरोनाचा हा राक्षस…’; मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या भराडी देवीकडे मागीतलं ‘हे’ साकडं

कवठेमहांकाळ पुन्हा हादरलं, उपसरपंचाच्या खुनानंतर आता…

श्रद्धा कपुरने मारले प्रियांकच्या लग्नात ठुमके, पाहा व्हिडीओ!

लँड रोवरची शानदार डीफेंडर व्ही 8 झाली लाँच, जाणुन घ्या किंमत!

अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवसापासून सुरु होणार ‘आयपीएल’चा थरार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More