बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?”

सिंधुदुर्ग | भाजप नेते नारायण राणे यांनी अनेक मुद्द्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना राष्ट्रवादीचे प्रमुख आणि महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला हाणला.

कोरोना महामारीमुळे राज्यातील एक लाख तास हजार जणांचा मृत्यु झाला आहे मात्र त्याची चर्चा होत नाही. मुख्यमंत्र्यांनाही त्याचं काही गांभीर्य नाही, शेतकऱ्यांना अद्यापही काही मदत मिळाली नाही. मुख्यमंत्री कॅबिनेटला जात नाहीत. पत्रकार परिषद घेत नाही. अधिवेशनही अल्पकालावधीचं घेतात. शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

लोकसभेचं अधिवेशन हे 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत होणार आहे. मात्र महाराष्ट्रात फक्त दोनच दिवसांचं अधिवेशन घेण्यात आलं आहे. हे राज्याचं अधिवेशन नसून केवळ तीन पक्षांचं अधिवेशन असल्याचं म्हणत राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं. यावरूनही राणेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

दरम्यान, सरकार वाचवण्यासाठी त्यांनी 12 आमदारांना निलंबित केलं. त्यांनी आमच्या बारा आमदारांचं निलंबन केलं असलं तरी त्यांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचं राणे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘आमदारकी गेली तरी चालेल पण…’; निलंबित आमदार आमदार राम सातपुतेंचा सरकारवर घणाघात

“शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रुपाने नवे तालिबानी महाराष्ट्रावर राज्य करू पाहत आहे”

“उज्ज्वला गॅस योजनेसाठी इम्पेरीकल डाटा वापरता मग ओबीसींसाठी का दिला जात नाही”

“भाजप-शिवसेनेचं नातं आमीर खान आणि किरण राव यांच्यासारखं”

“31 जूलैपर्यंत एमपीएससीच्या रिक्त जागांबाबत केलेली घोषणा फसवी आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More