बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्याला ड्रायव्हर नको, चांगला मुख्यमंत्री हवा- नारायण राणे

नवी दिल्ली | कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण भागात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये भयानक परिस्थिती झाली आहे. यावरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

चिपळूनमधील बाजारपेठा, अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना हेलिकॉप्टरने सुरळीत स्थळी नेण्याची गरज आहे. केंद्र सरकार हेलिकॉप्टरसह सर्व मदत करेल, असं आश्वासन नारायण राणेंनी दिलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

गाडी चालवत पंढरपूरला गेले पण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांकडे, त्यांच्या कुटुंबियांकडे पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही. राज्याला ड्रायव्हर नको आहे. राज्य सरकारकडे असे अनेक ड्रायव्हर आहेत. राज्याला चांगला, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हेलिकॉप्टर, बोटीने लोकांना काढणं, अन्न पुरवठा करणं, त्यांना सुरक्षितस्थळी नेणं हे काम सरकारनं केलं पाहिजे. मी केंद्रीय मंत्री नित्यानंतर रॉय यांच्याशी बोललो आहे. मी सगळी व्यवस्था करतो. गरज भासल्यास आपण केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशीही बोलणार असल्याचं राणेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

‘देशमुखांचं समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही ‘तोंड’ काळं’; भाजपची जहरी टीका

खडकवासला धरणातून विसर्ग सुरु, महानगरपालिकेचा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

कोकणात पावसाचा रुद्रावतार, चिपळूण शहर पाण्यात…

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला भाजपची लाख मोलाची मदत, तब्बल 20 लाखाचं फेडलं कर्ज

‘पुण्यासाठी काहीच केलं नाही त्यांचे बॅनर ‘विकासपुरूष’ म्हणून झळकतात’; पवारांचा फडणवीसांवर निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More