बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे दोनवेळा घरातून पळून गेले, त्यांना नारायण राणेंनी परत आणलं”

मुंबई | सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) शिंदे गटात गेलेल्या बंडखोर आमदारांवरही सडकून टीका केली. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या (Sanjay Raut) प्रश्नांची उत्तरं देताना भाजपला (BJP) देखील धारेवर धरलं.

उद्धव ठाकरेंच्या या महामुलाखतीनंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवरही निशाणा साधला. भाजपकडून ठाकरेंवर टीका होत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) तरी कसे मागे राहतील. महामुलाखतीनंतर नारायण राणेंनी थेट पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं आहे.

ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी केलेल्या खुलास्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे दोनवेळा घरातून पळून गेले होते. उद्धव ठाकरेंना आठवत असेल तर विचारा त्यांना दोन्ही वेळा घरी कोणी आणलं? या नारायण राणेंनी आणलं आणि आमचं घर तोडायला हा निघाला होता, असा गौप्यस्फोट नारायण राणेंनी केला आहे.

दरम्यान, बाळासाहेबांची तब्येत बिघडण्यामागचं कारण उद्धव ठाकरे होते. त्यांनी बाळासाहेबांना फक्त ताप आणि संताप दिला, असा आरोप देखील नारायण राणेंनी केला आहे. तर उद्धव ठाकरे अत्यंत कपटी आहेत, अशी टीका देखील राणेंनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘घरगुती कार्यक्रम एकदम ओक्के’, महामुलाखतीवरून चित्रा वाघ यांची टोलेबाजी

“…संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी”

‘आपलेच प्रश्न आपलीच उत्तरं, मुलाखत नाही हा घरचा मामला’; मनसेची तुफान टोलेबाजी

निवडणुकांचा धुरळा उडणार; 236 प्रभागांसाठी ‘या’ दिवशी आरक्षण सोडत होणार जाहीर

तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More